शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... टीकटॉकच्या नावानं तुमची फसवणूक, महाराष्ट्र सायबरकडून महत्त्वाची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 12:32 IST

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढल. सीमारेषेवरील या रक्तरंजित संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाल्याने चीनविरोधात संतापाची लाट पसरली.

मुंबई - केंद्र सरकारने Tiktok या चायना अॅपवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही  या अँपचे अनेक वापरकर्ते व चाहते  इंटरनेटवर आहेत. याचा फायदा  घेण्यासाठी सायबर भामट्यांनी एक फेक Tiktok Pro लिंक बनविली आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. तसेच, नागरिकांना या फेक लिंकपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन करताना काही महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत. 

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढल. सीमारेषेवरील या रक्तरंजित संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाल्याने चीनविरोधात संतापाची लाट पसरली. चीनच्या कुरापतींना आर्थिक झटका देण्यासाठी भारताने राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देता टिकटॉकसह ५९ चिनी अँप्सवर बंदी आणली. सरकारने घेतलेल्या या निर्णयाने चीनला दणका बसला. सरकारने Tiktok सहित अन्य ५८ अँपवर बंदी घातली आहे. परंतु चाहते  इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी  सायबर भामट्यांनी उपरोक्त फेक लिंक बनवली असून त्याचा प्रसार व्हाट्सअँप मेसेजेस व sms वर केला जातो. तुमची सर्व माहिती सायबर भामट्यांकडे जाते. त्या मेसेजचा एक प्रकार खालील प्रमाणे आहे.

       महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि तुम्ही अशा कोणत्याही मेसेजच्या लिंक वर क्लिक करु नये. तसेच हे लक्षात ठेवा कि, अशा लिंक्समध्ये Malware असू शकतो. त्यामुळे यापासून सावध असावे. तसेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

नेटीझन्सना महाराष्ट्र सायबरकडून सूचना

नेटीझन्स युजर्संने apk फाईल्स डाऊनलोड करु नये, ज्या लिंकमधून बॅन करण्यात आलेल्या कुठल्याही अॅपचा संदर्भ देण्यात येतो. 

आपणास तसा मेसेज आल्यास तो डिलीट करा आणि इतरही कोणाला फॉरवर्ड करु नका

गुगल प्ले स्टोअरवर असं कुठलंही अॅप अस्तित्वात नाही, त्यामुळे आपण संबंधित लिंक डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करु नका.   

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम