कोकणात तापमानवाढ
By Admin | Updated: March 20, 2017 03:07 IST2017-03-20T03:07:28+5:302017-03-20T03:07:28+5:30
कोकण व गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तसेच विदर्भाच्या काही भागांत

कोकणात तापमानवाढ
पुणे : कोकण व गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तसेच विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ उन्हाच्या झळांनी सर्वच घामाघूम झाले आहेत. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा येथे ३८़५ अंश आणि सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १५़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़ राज्याच्या उर्वरित भागांत तापमान सरासरीच्या जवळपास होते़ पुण्यात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, कमाल व किमान तापमान ३६ आणि १६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :
पुणे ३४़६, जळगाव ३६़६, कोल्हापूर ३६़५, महाबळेश्वर ३०़७, मालेगाव ३७़२, नाशिक ३३़७, सांगली ३८, सातारा ३६़७, सोलापूर ३८, मुंबई ३२़२, अलिबाग २९़१, रत्नागिरी ३२़४, पणजी ३२़८, डहाणू ३१़६, औरंगाबाद ३५़२, परभणी ३७़५, अकोला ३७़३, अमरावती ३५़२, बुलढाणा ३४़२, ब्रम्हपुरी ३६़७, चंद्रपूर ३७, गोंदिया ३५़२, नागपूर ३७़५, वर्धा ३८़५, यवतमाळ ३६़