खानिवड्यामध्ये फिरता दवाखाना
By Admin | Updated: April 29, 2016 04:51 IST2016-04-29T04:51:25+5:302016-04-29T04:51:25+5:30
खानिवडे यांच्या व्यवस्थापनेने या भागातील नागरिकांच आरोग्य व्यवस्थापनासाठी फिरता दवाखाना सुरु केला आहे.

खानिवड्यामध्ये फिरता दवाखाना
वसई/पारोळ : नवनीत पब्लिकेशन यांच्या पुढाकाराने व ग्रुप ग्राम पंचायत खानिवडे यांच्या व्यवस्थापनेने या भागातील नागरिकांच आरोग्य व्यवस्थापनासाठी फिरता दवाखाना सुरु केला आहे. या फिरत्या दवाखान्यामुळे दुर्गम आदिवासी भागातील गरीब व गरजू रुग्णांना लाभ मिळणार आहे.
या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन सोमवारी ग्राम पंचायत कार्यालय खानिवडे येथे करण्यात आले. यावेळी नवनीतचे संचालक अतुल सेठीया, सी आर एस व्यवस्थापक तरून मापारा, शाखा व्यवस्थापक महेश गुजर, झेड पी सदस्या कल्याणी तरे, ग्राम विकास अधिकारी देवरे, सरपंच, उपसरपंच, तसेच डॉ संजय तिवारी व नवनिवार्चीत सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)
>असे असेल वेळापत्रक...
हा दवाखाना दर सोमवारी खानिवडे, मंगळवारी भालीवली, बुधवारी चिमणे, गुरुवार उंबरपाडा व शुक्रवारी हेदवडे या दुर्गम भागात येथे दुपारी १.३० ते ४ वाजेपर्यंत असेल. पुढील काळात वाडिया या मुंबईच्या प्रख्यात हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली व अत्याधुनिक सेवेद्वारे या फिरत्या दवाखान्याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे महेश गुजर यांनी सांगितले.