वाळूचोरांनो, आता सावधान
By Admin | Updated: December 27, 2014 04:17 IST2014-12-27T04:17:36+5:302014-12-27T04:17:36+5:30
महसूल व पोलीस प्रशासनास डोकेदुखी ठरणाऱ्या अवैध वाळू उपशावर आता ‘एसएमएस’चा उतारा शोधण्यात आला आहे. राज्य सरकारने सध्याच्या स्मार्ट

वाळूचोरांनो, आता सावधान
मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूर (जि. अहमदनगर) -
महसूल व पोलीस प्रशासनास डोकेदुखी ठरणाऱ्या अवैध वाळू उपशावर आता ‘एसएमएस’चा उतारा शोधण्यात आला आहे. राज्य सरकारने सध्याच्या स्मार्ट जमान्यात ‘स्मॅटस्’ (सँड मायनिंग अॅप्रोव्हल अँड ट्रॅकिंग सिस्टीम) नावाची नवी प्रणाली विकसित केली आहे. मोबाइल आधारित या प्रणालीच्या अंमलबजावणीचा आदेश शुक्रवारी (२६ डिसेंबर) महसूल विभागाने काढला आहे.
वाळूचा बेकायदा उपसा व वाहतूक रोखणे महसूल प्रशासनास डोकेदुखी ठरते. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या जिवावरही बेतले
आहे. पोलीस पाटलांपासून ते प्रांताधिकाऱ्यांवर वाळू तस्करांनी ट्रक घातल्याचे प्रकार घडले आहेत.
महाआॅनलाइनने विकसित केलेल्या प्रणालीमुळे लिलावधारकव संबंधित महसूल अधिकाऱ्यांना वाळू गटातून संबंधित कंत्राटदार करत असलेले उत्खनन, वाळूचे वजन, वाहन क्रमांक, वाळू गटाचे नाव, क्रमांक, वाहन कोठून कोठे जाणार आहे, त्या दोन ठिकाणांमधील अंतर आदी तपशील मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविले जातील. त्यामुळे अधिकाऱ्यांना वाळू ट्रक तपासल्यानंतर त्याची शहानिशा करता येईल.
वाळू लिलावधारकांबरोबर करावयाच्या करारनाम्यातील अटी व शर्तींचे निश्चितीकरण तसेच अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध होण्यासाठी या प्रक्रियेत पारदर्शकता येऊन राज्याच्या महसुलात वाढ होण्यासाठी लागू होणारी ही प्रणाली हातभार लावेल, अशी सरकारची अपेक्षा आहे.