सातार्‍यात जमावाकडून वॉर्डबॉयचा खून

By Admin | Updated: May 26, 2014 02:06 IST2014-05-26T02:06:06+5:302014-05-26T02:06:06+5:30

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नवविवाहितेचा अतिदक्षता विभागात विनयभंग केल्याच्या आरोपावरून पीडित महिलेच्या नातेवाइकांनी वॉर्डबॉयला बेदम मारहाण केली.

Wardboy murdered by the mob in Satara | सातार्‍यात जमावाकडून वॉर्डबॉयचा खून

सातार्‍यात जमावाकडून वॉर्डबॉयचा खून

सातारा/वाई : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नवविवाहितेचा अतिदक्षता विभागात विनयभंग केल्याच्या आरोपावरून पीडित महिलेच्या नातेवाइकांनी वॉर्डबॉयला बेदम मारहाण केली. त्यामध्ये वॉर्डबॉयचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. पीडित नवविवाहिता पतीसमवेत मुंबई येथे वास्तव्यास आहे. तिच्या सासूचे निधन झाल्याने ती गावी आली. शनिवारी तिला वाईच्या डॉ. घोटवडेकर यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. फक्त तुषार रवींद्र जाधव (२४) हा वॉर्डबॉय तेथे होता. पहाटे तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तिने तुषारला याची कल्पना दिली. तुषारने तिला भूल देण्याचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. मात्र, भूल दिलेल्या औषधाची मात्रा टोकाची नसल्याने तिला हा सर्व प्रकार जाणवत होता. तिने सकाळी ही घटना सांगितल्यावर संतप्त पतीने नातेवाइकांसह येऊन तुषारला मारहाण केली. त्याला जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात नेले. त्यावेळी तुषारला घाम आला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेले. मात्र तेथेच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Wardboy murdered by the mob in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.