शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

महापालिकांची प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी १२ डिसेंबरला येणार; सुधारित आदेशानुसार जारी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:36 IST

२९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमात बदल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमात बदल केला आहे. २८ नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती, ती आता १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महापालिका प्रशासन आता प्रारुप मतदार यादी ६ नोव्हेंबर ऐवजी १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहे. या यादीवर १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हरकती व सूचना मागवून ६ डिसेंबर रोजी निर्णय घेऊन प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्याचबरोबर ८ डिसेंबरला रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करून १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार या यादी सुधारित आदेशानुसार जारी केली जाणार आहे.

‘दुबार’वरून आयोगावर राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई: निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. आयोग फक्त संविधानात स्वायत्त आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातचे ते बाहुले असल्याची १००% खात्री पटली, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. ते म्हणाले, दुबार मतदार नोंदणी ते मतदार यादीतील घोळ यावरील प्रश्नावर आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर त्यांचा काय उपयोग आहे. जबाबदारी झटकली आहेच आता उत्तरदायित्वही नाकारणार. मग या पदांचे करायचे काय?

आयोगाने दुबार मतदारांसमोर दोन स्टार्स असतील असे सांगितले आहे. ज्या मतदार यादीत पत्ते चुकीचे आहेत. वडिलांचे नाव वेगळे आहे, एका घरात ४०-५० मतदार नोंदवले आहेत. अशी सगळी नावे गाळून मतदार यादी हवी आहे. स्टार करणार म्हणजे त्या माणसाला विचारणार? ती त्यांना कशी सापडणार? याचे काहीच उत्तर दिले नाही. आयोगाचे जे मालक आहेत तो भाजप त्यांचा अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील, अशी टीका उद्धवसेनेचे नेते आ. अनिल परब यांनी केली. 

दुबार-तिबार नावांची जबाबदारी कोणाची?

प्रचंड घोळ असलेल्या मतदारयाद्या दुरुस्त न करता निवडणुका जाहीर करणे हे योग्य नाही. लोकशाहीमध्ये निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही आयोगाची जबाबदारी आहे. पण, ती जबाबदारी न घेता त्यापासून पळ काढत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Municipal ward-wise final voter list on December 12, says election commission.

Web Summary : State Election Commission revised the voter list schedule for municipal elections. Final ward-wise voter lists will be published December 12. Raj Thackeray criticized the commission over duplicate voter registration issues.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकMaharashtraमहाराष्ट्रLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक