शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

डोमिसाईल प्रमाणपत्र काढायचंय; पाहा कसे आणि कुठे मिळते? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:45 IST

अनेकदा महत्त्वाच्या कामादरम्यान अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्राची गरज लागते आणि शेवटच्या क्षणी धावाधाव करावी लागते.

सुहास शेलारतहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र वा ‘आपले सरकार’ या शासनाच्या संकेतस्थळावरून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र काढता येते. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे.

कोणती कागदपत्रे लागतात? ओळखीचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचे छायाचित्र, निमशासकीय ओळखपत्र, रोजगार हमी योजना ओळखपत्र, वाहनचालक परवाना यांचा वापर करता येऊ शकतो.

तर पत्त्याचा पुरावा पासपोर्ट, वीज देयक, दूरध्वनी देयक, शिधापत्रिका, भाडेपावती, मालमत्ता कर पावती, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ उतारा यांचा वापर करता येईल. वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी) यापैकी काही कागदपत्रे आवश्यक आहेत. सामान्यत: यासाठी केवळ ३४ रुपये शुल्क आकारले जाते.

रहिवासाचा पुरावाग्रामसेवक, तलाठी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतलेला रहिवासी दाखला आणि स्वयंघोषणापत्र

विद्यार्थ्यांसाठीअर्जदार १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचे डोमिसाईल प्रमाणपत्र, शाळा प्रवेशाचा पुरावा.

महत्त्वाच्या कामादरम्यान अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्राची गरज लागते आणि शेवटच्या क्षणी धावाधाव करावी लागते. हे प्रमाणपत्र मिळण्यास सामान्यपणे ८ ते १५ दिवसांचा कालावधी लागत असल्याने काहींच्या नोकरीच्या संधी हुकतात, आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही किंवा शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. यापासून वाचण्यासाठी आजच डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी अर्ज करा.

आपले सरकार संकेतस्थळावर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीत तो मंजूर होऊन वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र मिळते. काही कारणास्तव प्रमाणपत्र प्राप्त होण्यास उशीर झाल्यास १५ दिवसानंतर ‘आपले सरकार’च्या संकेतस्थळावर लॉग इन करुन अपिल अर्ज सादर करता येतो.

  • अधिकृत संकेतस्थळ https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
  • संकेतस्थळावर नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.
  • तेथे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून लॉग इन करावे.
  • लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग दिसतील. त्यातील महसूल विभाग आणि पुढे पुढे महसूल सेवा हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर वय, राष्ट्रीयत्व व डोमिसाईल प्रमाणपत्र हा पर्याय निवडावा.
  • तेथे आवश्यक कागदपत्रांची यादी सादर होईल.
  • पुढे वैयक्तिक माहिती, पत्ता आणि अन्य माहिती सादर करावी.
  • संकेतस्थळावर अपलोड करावयाची कागदपत्रे ७५ ते ५०० केबीच्या आत असावीत.
  • फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर अर्ज सादर करावा.
  • शुल्क भरल्याची पावती प्रमाणपत्र मिळेपर्यंत संग्रही ठेवावी.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र