शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 05:59 IST

राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा निवडणुकांसाठीची अधिसूचना उद्या, मंगळवारी जारी होईल.  २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

अधिसूचना जारी झाल्यानंतर विहित नमुन्यातील उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून सुरू होते यासाठी राज्यभरात तयारी पूर्ण झाली असल्याचे मनोहर पारकर यांनी सांगितले. दि. ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत दि. ४ नोव्हेंबर असून, त्यानंतर राज्यातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

शनिवार-रविवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसांची मुदत असली तरी दुसरा व चौथा शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी अर्ज दाखल करता येत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवस मिळणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज देता येईल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MLAआमदारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024