आघाडी हवी, पण सन्मानजनक - तटकरे

By Admin | Updated: January 25, 2017 03:04 IST2017-01-25T03:04:00+5:302017-01-25T03:04:00+5:30

महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत. याचा अर्थ काँग्रेस व समविचारी पक्षांनी राष्ट्रवादी कमकुवत आहे,

Want a lead, but respectful - tatkare | आघाडी हवी, पण सन्मानजनक - तटकरे

आघाडी हवी, पण सन्मानजनक - तटकरे

अकोला : महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत. याचा अर्थ काँग्रेस व समविचारी पक्षांनी राष्ट्रवादी कमकुवत आहे, असा काढू नये. आम्हाला आघाडी हवीच आहे, पण सन्माजनक, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.
शिवसेनेचे नेते, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी बोलताना तटकरे म्हणाले, भाजपा-सेनेच्या सत्तेने सामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. अच्छे दिन, बँक खात्यामध्ये १५ लाख असे स्वप्न सर्वसामान्य जनतेला दाखविले. हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकत नाही, हे याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आता खुलेआम सांगत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे धोरण या सरकारचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Want a lead, but respectful - tatkare