वानखेडेवर चोख बंदोबस्त
By Admin | Updated: October 31, 2014 01:29 IST2014-10-31T01:29:21+5:302014-10-31T01:29:21+5:30
वानखेडे स्टेडियमवर होऊ घातलेल्या उद्याच्या शपथविधीसाठी मुंबई पोलिसांनी दिवसभर स्टेडियमचा परीघ नो फ्लाईंग झोन जाहीर केला आहे.

वानखेडेवर चोख बंदोबस्त
नो फ्लाईंग झोन : पाच हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर होऊ घातलेल्या उद्याच्या शपथविधीसाठी मुंबई पोलिसांनी दिवसभर स्टेडियमचा परीघ नो फ्लाईंग झोन जाहीर केला आहे. बंदोबस्तासाठी मुंबई पोलीस दलासह विविध विशेष पथकांमधील सुमारे 5 हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी स्टेडियममध्ये व बाहेर तैनात केले जाणार आहेत.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षातले वरिष्ठ पदाधिकारी, उद्योगपती, व्यावसायिक, अभिनेते, खेळाडू अशा विविध क्षेत्रंतली व्हीव्हीआयपी, व्हीआयपी मंडळी उपस्थित राहणार आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 5 हजार निमंत्रित व्हीआयपी आहेत. त्यामुळे या सोहळ्याची सुरक्षा पोलिसांसाठी प्राधान्यक्रमावर आहे.
या सुरक्षेसाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथकातील प्रशिक्षित जवानांची पाळत स्टेडियमवर घडणा:या प्रत्येक घडामोडीवर असेल. स्टेडियमवर सुमारे अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमे:यांवरील चित्रणावर पोलिसांच्या विशेष पथकाची करडी नजर असेल.
मैदानात सुमारे 3क् हजार खुच्र्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावर 5 हजार व्हीआयपींसह अन्य आमंत्रित आसनस्थ होतील. उद्या दुपारी 4 वाजल्यापासून मान्यवरांची रांग स्टेडियमबाहेर लागेल. मात्र सकाळपासूनच बॉम्बशोधक व नाशक पथक आणि अन्य यंत्रणा मैदान व स्टेडियमचा कानाकोपरा चाचपणार आहेत. स्टेडियमकडे येणा:या प्रमुख रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने नाकाबंदी करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळते. दुपारी 2 ते 7च्या दरम्यान पार्किग परिसरात वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस जॉइंट सीपी बी.के. उपाध्याय यांनी दिली.
बहुजन विकास आघाडीचा भाजपाला पाठिंबा
1पालघर जिल्ह्याची प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याच्या बदल्यात भाजपा सरकारला पाठिंबा देण्याचे बहुजन विकास आघाडीने जाहीर केले आहे. ब. वि. आघाडीचे आ. क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागणीसंदर्भात फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आघाडीच्या सूत्रंनी सांगितले.
2ब. वि. आघाडीने पालघर जिल्ह्यात तीन जागा जिंकल्या आहेत. बुधवारी आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यकत्र्याची बैठक झाली. त्यात सरकार स्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पाठिंबा देताना विकासासोबत नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण करण्याकरिता सहकार्याची अपेक्षा करण्यात आली आहे. या वेळी 28 मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
एक हजार वाहतूक पोलीस तैनात
च्जवळपास 25 टोईंग व्हॅनची निवडक पार्किंग रोडवर व्यवस्था करण्यात आली आहे. या वेळी मोठय़ा प्रमाणात निमंत्रित मंडळी बसेसने येण्याची शक्यता आहे. या बसेस विधान भवन, एनसीपीए, इस्लाम जिमखाना, ग्रँट मेडिकल कॉलेज, एम.जी. रोडसारख्या ठिकाणी उभ्या करण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांच्या नियंत्रणाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे.
च्या सोहळ्यासाठी तब्बल 1 हजार वाहतूक पोलीस दिमतीला देण्यात आले आहेत. मुंबई विमानतळ ते वानखेडे स्टेडियमर्पयत येणा:या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांना कुठलाही अडथळा होऊ नये तसेच वानखेडे परिसरातील पार्किग सांभाळतानाच, वाहतूक कोंडी न होऊ देण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर टाकण्यात आल्याची माहिती मिळते.