शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीड प्रकरणात वाल्मीक कराडच ‘मास्टरमाइंड’; सोनवणेचे नाव वगळले, कोणावर कोणते गुन्हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 05:48 IST

आठ आरोपींना अटक केली असून, कृष्णा आंधळे हा घटनेपासून फरारच आहे. दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे ‘सीआयडी’ने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. देशमुख हत्येसह इतर गुन्ह्यांचे १ हजार पानांचे दोषारोपपत्र ‘सीआयडी’ने गुरुवारी बीडच्या मकोका न्यायालयात दाखल केले. दोषारोपपत्रात वाल्मीक हा आरोपी क्रमांक एक आहे. मात्र, सरपंच देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे याचे नाव या दोषारोपपत्रातून वगळण्यात आले आहे. त्याच्याविरोधात पुरावा नसल्याचा खुलासा सीआयडीने केला.

सरपंच देशमुख हत्या, त्याअगोदर ॲट्रॉसिटी व मारहाण आणि खंडणी या गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे होता. या गुन्ह्यांत कराडसह नऊ जण आरोपी होते. 

आरोपींची नावे आणि कोणावर कोणते गुन्हे?

१. वाल्मीक कराड : खून १२. विष्णू चाटे : खून १३. सुदर्शन घुले : खुनाचा प्रयत्न १, अपहरण २, खून १४. प्रतीक घुले : विनयभंग १, दुखापत १, खून १५. सुधीर सांगळे : खून १६. महेश केदार : खुनाचा प्रयत्न २, खून १, चोरी १, दुखापत २७. जयराम चाटे : खुनाचा प्रयत्न १, दुखापत १, खून १८. कृष्णा आंधळे (फरार) : खुनाचा प्रयत्न १, दुखापत १, खंडणी १, खून १

सिद्धार्थ सोनवणे याने संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याचा आरोप होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, लवकरच बाहेर येणार असल्याचे समजते.दोषारोपपत्र दाखल केलेल्या आरोपींवर  ११ गुन्हे दाखल आहेत. पैकी ८ गुन्ह्यांचे आरोपपत्र कोर्टात दाखल आहे.

‘सरपंच, तुला जिवंत सोडणार नाही’

६ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मीकला खंडणी दिली नाही म्हणून सुदर्शन घुलेसह इतर मस्साजोगला गेले. तेथे कंपनीच्या सुरक्षा रक्षकाशी वाद घालत असतानाच सरपंच संतोष देशमुख तेथे आले. त्यांनी असे करू नका, अशी विनंती करत अडवले. यावर घुले याने ‘सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली होती.

प्रकरण केज कोर्टात वर्ग

आठ आरोपींना अटक केली असून, कृष्णा आंधळे हा घटनेपासून फरारच आहे. सीआयडीने अनेक आरोप-प्रत्यारोप झालेल्या या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर हे प्रकरण केज न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

 

 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराड