शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

150 किमीची पदयात्रा करा, मतदारांना भेटा; 'त्या' सर्वेक्षणानंतर भाजपाच्या आमदारांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 07:16 IST

अंतर्गत सर्वेक्षणातून भाजपाच्या 40 टक्के आमदारांची निराशाजनक असल्याची माहिती समोर

मुंबई: मतदारांसोबतचा संपर्क वाढवण्यासाठी पदयात्रा करण्याच्या सूचना प्रदेश भाजपाकडूनआमदारांना देण्यात आल्या आहेत. शेतीशी संबंधित प्रश्न, दुष्काळसदृश्य परिस्थिती, इंधनाचे वाढते दर यामुळे सर्वसामान्य जनतेत सरकारविरोधात नाराजी आहे. त्यातच भाजपाच्या 40 टक्के आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचं पक्षाकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्वेक्षणाची भाजपा नेतृत्त्वानं चांगलीच धास्ती घेतली आहे. मतदारसंघात पदयात्रा करा, लोकांना भेटा, अशा सूचना प्रदेश भाजपानं सर्व आमदारांना दिल्या आहेत. संपर्क अभियानाच्या अंतर्गत भाजपाच्या सर्व आमदारांना 150 किलोमीटरची पदयात्रा करावी लागणार आहे. यामुळे मतदारांशी असलेला संपर्क आणखी वाढेल, अशी माहिती पक्षाच्या एका नेत्यानं दिली. 'महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत. गांधींचं जयंती वर्ष विधायक कामानिमित्त लक्षात राहावं, यासाठी ही पदयात्रा केली जाणार आहे,' अशी माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. 'संपर्क अभियान कशा पद्धतीनं राबवायचं, त्याचा नेमका हेतू काय, पक्षाला यातून नेमकं काय अपेक्षित आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती 121 आमदारांना देण्यात आली आहे,' असंदेखील या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.  2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 122 आमदार निवडून आले. मात्र नागपूरचे आमदार आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्यानं भाजपाच्या आमदारांची संख्या 121 वर आली आहे. त्यातच गेल्याच आठवड्यात भाजपानं केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी पुढे आली. दिल्लीतील चाणक्य या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, भाजपाच्या 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. आमदारांच्या मतदारसंघातील जनतेला प्रश्न विचारुन हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळेच प्रदेश भाजपानं रस्त्यावर उतरुन मतदारांना भेटण्याच्या, त्यांच्याशी संवाद साधण्याच्या सूचना केल्याची माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस