नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दीची प्रतिक्षा
By Admin | Updated: February 18, 2017 18:21 IST2017-02-18T17:15:37+5:302017-02-18T18:21:14+5:30
पुण्याप्रमाणेच नाशिकमध्येही मुख्यमंत्री देवेंद्रसभा होणार आहे, मात्र अद्यापही सभेसाठी पुरेसी गर्दी जमलेली नाही.

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दीची प्रतिक्षा
नाशिक, दि. १८ - महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र अद्यापही पुरेशी गर्दी जमलेली नाही. दुपारी साडेचार वाजेची सभेची नियोजित वेळ होती. फडणवीस यांचे नुकतेच पोलीस संचलन मैदानावर आगमन झाले असून कान्हेरे मैदानावर अद्याप पाचशे नागरिक जमल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेतील सभेला कोणीही उपस्थित न राहिल्याने फडणवीस यांना तेथून माघारी फिरावे लागले होते.