दुसºया दिवशीही उमेदवारी अर्जांची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 28, 2017 21:32 IST2017-01-28T21:32:33+5:302017-01-28T21:32:33+5:30
महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२८) तीन उमेदवारांनी अर्ज सादर केले.

दुसºया दिवशीही उमेदवारी अर्जांची प्रतीक्षा
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२८) तीन उमेदवारांनी अर्ज सादर केले. दुसऱ्या दिवशीही उमेदवारांनी निवडणूक कार्यालयांकडे पाठ फिरविली. पहिल्या दिवशी मौनी अमावास्येमुळे मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांची पंचाईत झाली, तर दुसऱ्या दिवशी शनिवारीही निवडणूक कार्यालय परिसरात शुकशुकाट राहिला. मात्र, आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजूळव करण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची लगीनघाई सुरू होती. ना हरकत दाखले मिळविण्यासाठी महापालिकेने सुटीच्याही दिवशी आपले काउंटर सुरू ठेवले होते.