२0 पेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना थांबा

By Admin | Updated: October 20, 2016 06:01 IST2016-10-20T06:01:44+5:302016-10-20T06:01:44+5:30

दिवा स्थानकात जलद लोकलना थांबा देण्यात यावा, अशी मागणी वारंवार करत, आंदोलनाची भूमिका दिवावासीयांकडून घेण्यात आली.

Wait over more than 20 local tournaments | २0 पेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना थांबा

२0 पेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना थांबा


मुंबई : दिवा स्थानकात जलद लोकलना थांबा देण्यात यावा, अशी मागणी वारंवार करत, आंदोलनाची भूमिका दिवावासीयांकडून घेण्यात आली. ही मागणी लक्षात घेता, जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेकडून गेल्या काही दिवसांपासून ब्लॉक घेऊन काम केले जात आहे. २३ आॅक्टोबर रोजी शेवटचा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यानंतर काही दिवसांतच जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यात येईल. जवळपास २0 पेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना थांबा देण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रद्द होत असलेल्या लोकल आणि जलद मार्गाने जाणाऱ्या लोकल पाहता, यामुळे दिवा स्थानकातील धिम्या मार्गावर प्रवाशांनी जानेवारी २0१५ मध्ये उग्र आंदोलन करत, बरीच तोडफोड केली. यामध्ये स्थानकाचे प्रचंड नुकसान झाले. या आंदोलनानंतर दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्याची मागणीला जोर धरू लागला आणि एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन), तसेच मध्य रेल्वेने दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म आणि नवीन मार्ग टाकण्यासाठी नियोजन केले. हे काम अंतिम टप्प्यात असून, गेल्या काही दिवसांत रविवारी नऊ ते दहा तासांचा ब्लॉक घेऊन दिवा स्थानकात कट-कनेक्शनचे काम केले जात आहे. २३ आॅक्टोबर रोजी शेवटचा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यानंतर जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यात येईल, अशी माहिती समोर आली. २0 पेक्षा जास्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या काही लोकलमध्ये दिवा स्थानकात थांबा देण्यात येत असल्याच्या उद्घोषणेचे काम बहुतांश लोकलमध्ये होताच, थांबा देण्यास सुरुवात केली जाईल. (प्रतिनिधी)
>थांबा देण्यास सुरुवात
अप आणि डाउन मार्गावरून जाताना, प्रत्येकी १0 किंवा १२ जलद लोकल फेऱ्या दिवा स्थानकात थांबविल्या जातील, अशी माहिती देण्यात आली. दिवा स्थानकात थांबा देण्यात येत असल्याच्या उद्घोषणेचे काम होताच, थांबा देण्यास सुरुवात केली जाईल.

Web Title: Wait over more than 20 local tournaments