वागळेत चार घरे जाळण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: January 14, 2015 04:45 IST2015-01-14T04:45:53+5:302015-01-14T04:45:53+5:30

वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी गावात एकाच इमारतीमधील चार घरांवर ज्वलनशील पदार्थ टाकून ते पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली

Wagle's attempt to burn four houses | वागळेत चार घरे जाळण्याचा प्रयत्न

वागळेत चार घरे जाळण्याचा प्रयत्न

ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी गावात एकाच इमारतीमधील चार घरांवर ज्वलनशील पदार्थ टाकून ते पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. यामध्ये दीपक आणि संदीप या भावांच्या घरांचा समावेश आहे. याप्रकरणी अद्यापही कोणाला अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हाजुरी गावातील साईनाथ अपार्टमेंट ‘ए’ विंगमधील दीपक काळे, संदीप काळे, सुजीत सिंग आणि सूर्यकांत सरमळकर यांच्या घरांवर एकाच वेळी रॉकेलसदृश ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आले आणि आग लावण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसून कारणही अद्याप समजू शकले नसल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एम. घोळकर यांनी दिली.
याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यामगाच्या कारणांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Wagle's attempt to burn four houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.