वाघाशी झालेल्या झुंजीत वाघीण ठार!
By Admin | Updated: January 2, 2015 01:29 IST2015-01-02T01:29:01+5:302015-01-02T01:29:01+5:30
वाघाशी झालेल्या झुंजीत वाघिणीचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले़

वाघाशी झालेल्या झुंजीत वाघीण ठार!
भद्रावती (जि़ चंद्रपूर) : वाघाशी झालेल्या झुंजीत वाघिणीचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले़ ही घटना भद्रावती तालुक्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या मुधोली काटवल बफर झोन क्षेत्रात घडली.
मृत वाघीण अंदाजे चार वर्ष वयाची असून, उंची ८७ सेमी तर लांबी १७० सेंटीमीटर आहे. मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील वनमजूर गुरुवारी पहाटे ५ वाजता गस्तीवर असताना त्यांना पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळली. याच परिसरात १०० मीटर अंतरावर असलेल्या तलावात रानडुक्करदेखील मृतावस्थेत आढळले. या डुकराच्या अंगावर जखमा होत्या. हल्लेखोर वाघ मृत वाघिणीशी प्रणयक्रिडेसाठी उत्सुक होता. परंतु त्याला वाघिणीने प्रतिसाद न दिल्याने चिडलेल्या वाघाने अखेर हल्ला करून वाघिणीला ठार मारले असावे, असा अंदाज मोहुर्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुलकर यांनी वर्तविला आहे. वाघाचा आम्ही शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मृत वाघिणीची उत्तरीय तपासणी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे यांनी केली. त्यानंतर मृत वाघिणीवर अंतिम संस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
वर्षभरात ६४ वाघ गमावले!
‘नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन अॅथॉरिटी’ने त्यांच्या ३्रॅी१ल्ली३.ल्ल्रू.्रल्ल या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात भारतात एकूण ६४ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. या मृत्यूंची राज्यनिहाय आकडेवारी अशी :
च्यापैकी चार वाघांचा आपसातील झुंजींमुळे मृत्यू झाला तर दोन वाघांना पोलिसांनी गोळ््या घालून ठार मारले. एका वाघाचा न्युमोनियाने तर आणखी एकाचा अन्य नैसर्गिक मृत्यू झाला.
च् इतर वाघ शिकारीचे बळी ठरले असावेत, असा संशय असून त्या प्रकरणांची चौकशी सुरु आहे, असेही या अॅथॉरिटीने नमूद केले आहे.
च्वर्ष २०१० मध्ये केल्या गेलेल्या व्याघ्रगणनेनुसार भारतातील वाघांची संख्या १,७०६ होती. २०१४ च्या व्याघ्रगणनेची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.