अटकपूर्व जामिनासाठी वाडकरांची धाव

By Admin | Updated: June 29, 2014 00:51 IST2014-06-29T00:51:27+5:302014-06-29T00:51:27+5:30

प्रख्यात गायक सुरेश वाडकर व विनायक धोपावकर आणि विजया करंदीकर यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आह़े

Wadkar's run for anticipatory bail | अटकपूर्व जामिनासाठी वाडकरांची धाव

अटकपूर्व जामिनासाठी वाडकरांची धाव

>नाशिक : भागीदारीत घेतलेल्या जमिनीचा नंतरच्या काळात भागीदाराला डावलून परस्पर व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी प्रख्यात गायक सुरेश वाडकर व  विनायक धोपावकर आणि विजया करंदीकर यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आह़े या गुन्हय़ात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी वाडकर यांच्या वकिलाने शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून, यावर 1 जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रंनी दिली आह़े 
देवळाली शिवारातील सव्र्हे नंबर 7/13 येथील 77 आर जमीन खरेदीचे हे प्रकरण आह़े न्यायालयात दावा न्यायप्रविष्ट असताना वाडकर यांनी सदर जमिनीचे मूळ मालक विनायक धोपावकर व विजया करंदीकर यांना हाताशी धरून 7 फेब्रुवारी 2क्13 रोजी वादात सापडलेली मालमत्ता स्वत:च्या नावे लिहून घेतली, असे तक्रारदार कोठीकर यांचे म्हणणो आहे. 

Web Title: Wadkar's run for anticipatory bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.