रविवार पेठेतील वाडा कोसळला
By Admin | Updated: August 7, 2014 23:18 IST2014-08-07T23:18:25+5:302014-08-07T23:18:25+5:30
आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने आज रविवार पेठेतील भोरी मशिदीजवळील वाडय़ाची मागील भिंत कोसळली.

रविवार पेठेतील वाडा कोसळला
>पुणो : आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने आज रविवार पेठेतील भोरी मशिदीजवळील वाडय़ाची मागील भिंत कोसळली. सुदैवाने कोसळलेल्या भागात कोणीही राहत नसल्याने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
दरम्यान, मागील बाजूची भिंत कोसळल्यानंतर संपूर्ण वाडाच धोकादायक झाल्याने, तो तत्काळ पाडण्याच्या सूचना महापालिका; तसेच बांधकाम विभागाकडून संबंधित जागामालकास देण्यात आल्यानंतर, रात्री उशिरार्पयत हा वाडा उतरविण्याचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार - 644, रविवार पेठ येथे भोरी मशिदीजवळ फक्रुद्दिन रोशनअली घिवाला यांचा सुमारे 6क् वर्षापूर्वी बांधण्यात आलेला दोन मजली वाडा आहे. या वाडय़ात दोन भाडेकरू राहतात. त्यातील एका भाडेकरूकडून घर बंद ठेवले असून, दुसरे भाडेकरू वाडय़ाच्या पुढील भागात राहतात. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वाडय़ाची मागील बाजूची दोन मजल्यांची भिंत आणि कौलारू छत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे मुख्य कार्यालयातील पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. (प्रतिनिधी)