नाशिकमध्ये दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का
By Admin | Updated: February 21, 2017 18:53 IST2017-02-21T16:47:34+5:302017-02-21T18:53:03+5:30
दुपारी मतदार मोठ्या संख्येने शहरासह उपनगरांमध्ये बाहेर पडल्यामुळे मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला.

नाशिकमध्ये दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का
: शहरात महापालिका निवडणूकीचे सकाळी साडेसात ते साडेबारा वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाले होते; मात्र दुपारी मतदार मोठ्या संख्येने शहरासह उपनगरांमध्ये बाहेर पडल्यामुळे मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला. दीड वाजता ३०.६३ टक्के मतदान झालेले होते. दीड ते साडे तीन च्या कालावधीत १३.३३ टक्के सरासरी मतदान होऊन एकूण ४३.३३ टक्के मतदान अद्याप झाले आहेत. दुपारी साडे चार वाजेनंतर आता सर्वच मतदान केंद्रांवर लांबलचक रांगा लागण्यास सुरूवात झाली आहे.