बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान

By Admin | Updated: February 16, 2017 10:31 IST2017-02-16T10:28:58+5:302017-02-16T10:31:38+5:30

जळगावमधील चाळीसगाव तालुक्यात एका नवरदेवाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला.

The voting made by Navarwade before going to Bauh | बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान

>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १६ - राज्यातील पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात झाली आहे. जळगावमध्येही मोठ्या उत्साहात मतदान होत असून चाळीसगाव तालुक्यातील जि.प.च्या 7 तर पंचायत समितीच्या 14 गणांसाठी मतदान प्रक्रियेला सकाळी 7.30 वाजता सुरुवात झाली. 
दरम्यान याच चाळीसगाव तालुक्यात देवळी- तळेगांव जिल्हा परिषद गटातील अंधारी येथे एका नवरदेवाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी प्रथम मतदान करत आपले कर्तव्य बजावले.  गणेश रामकिसन नागरे असे त्या युवकाचे नाव असून आज त्याचा विवाह आहे. मात्र लग्नबंधनात अडकून नव्या जीवनाला सुरूवात करण्यापूर्वी त्याने देशातील नागरिकाचे कर्तव्य बजावत प्रथम मतदानाचा हक्क बजावला. 

Web Title: The voting made by Navarwade before going to Bauh