शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रातील यंत्रांची होणार ‘मत’ पडताळणी.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 16:27 IST

मतमोजणीच्या वेळी अनेकदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ठळक मुद्देमतदान यंत्रातील दिलेली मते आणि व्हीव्हीपॅटमधील स्लीपवर नोंदली गेलेली मते यांची पडताळणी

पुणे : मतमोजणीच्या वेळी अनेकदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता नव्या मतदान यंत्रामध्ये दिलेले मत कागदावर देखील नोंदले जाणार आहे. त्यामुळे मोजणीच्या वेळी प्रत्येक विधानसभानिहाय एका मतदान केंद्रातील दिलेल्या मतांची आणि स्लीपवरील नोंदल्या गेलेल्या मतांची पडताळणी केली जाणार आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार सरसकट मतदानयंत्र आणि स्लीपवरील मतांची पडताळणी केली जाणार नसल्याची माहिती निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी लोकमत ला दिली. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटर मशिन (ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडीट ट्रोल (व्हीव्हीपॅट) या यंत्राची जोडगळी वापरली जात आहे. अगामी लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्राद्वारे दिलेले मत योग्य व्यक्तीला दिले की नाही हे समजण्यासाठी मतदानानंतर सात सेकंद संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह व्हीव्हीपॅट यंत्रावरील स्लिपवर दिसणार आहे. संबंधित स्लिप व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये बंद राहणार आहे. निवडणुकीसाठी मतदान यंत्राचा वापर सुरु झाल्यानंतरच पराभूत पक्ष अथवा उमेदवारांकडून यंत्राच्या विश्वासार्हतेबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मतदान यंत्र हॅक केले जाऊ शकते, विशिष्ट पक्षाच्या उमेदवारालाच मत जाईल, अशी देखील सोय मतदान यंत्रात केली जाते, असे आरोप झाले आहेत. त्यामुळे पूर्वी प्रमाणे कागदी मतपत्रिकेवर मतदानास सुरुवात करावी, अशीही मागणी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात सुधारणा करीत मतदाराला मतदानानंतर मत दिसण्याची सोय केली. इतकी खबरदारी घेऊनही काही व्यक्ती प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकतात. पराभूत उमेदवारांकडून फेर मोजणीची मागणी देखील केली जाऊ शकते. त्यावर आयोगाने विधानसभा मतदार संघानिहाय एका मतदान यंत्रातील दिलेली मते आणि व्हीव्हीपॅटमधील स्लीपवर नोंदली गेलेली मते यांची पडताळणी घेण्यात येणार आहे.  निवडणूक कामकाजाची माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह म्हणाल्या, उमेदवार म्हणतोय म्हणून सरसकट फेरमतमोजणी केली जाणार नाही. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार केंद्र चिठ्ठी टाकून निवडली जातील. त्या मतदान केंद्रात पडलेली मते आणि व्हीव्हीपॅट यंत्रातील स्लिपवर नोंदली गेलेली मते यांची पडताळणी केली जाईल. त्यामुळे सरसकट फेर मतमोजणीचा प्रश्नच येणार नाही. .

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान