विधान परिषदेसाठी भरघोस मतदान
By Admin | Updated: December 27, 2015 20:47 IST2015-12-27T20:47:39+5:302015-12-27T20:47:39+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठी आज (रविवारी) सर्वत्र अत्यंत चुरशीने मतदान झाले.

विधान परिषदेसाठी भरघोस मतदान
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठी आज (रविवारी) सर्वत्र अत्यंत चुरशीने मतदान झाले. कोल्हापूर येथे शंभर टक्के तर सोलापूर, अहमदनगर, धुळे-नंदुरबार आणि अकोला-बुलडाणा येथे ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २३० पैकी २०१ नगरसेवकांनी मतदान केले. मनसेने या निवडणुकीत तटस्थ राहाण्याची भूमिका घेतली होती. नागपूरमध्ये भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गिरीष व्यास हे बिनविरोध निवडून आले आहेत. बुधवारी, ३० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
शिवसेनेकडून रामदास कदम आणि काँग्रेसकडून भाई जगताप रिंगणात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड बंडखोरी करुन निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे दुस-या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. संख्याबळामुळे शिवसेनेला रामदास कदम यांच्या विजयाची खात्री आहे मात्र लाड यांच्या उमेदवारीमुळे भाई जगताप यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत
स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उमेदवार निवडून विधानपरिषदेवर पाठवणार आहेत. नुकसान टाळण्यासाठी शिवसेना-भाजपने युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे.