शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबरच्या प्रत्येक रविवारी होणार मतदार नोंदणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 19:01 IST

नव मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने आॅक्टोबर महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देयेत्या ३० आॅक्टोबर पर्यंत छायाचित्रावर आधारीत मतदार यादी अद्ययावत १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहिम मतदार मोहीमेसाठी महाविद्यालयांची घेणार मदत 

पुणे : नव मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने आॅक्टोबर महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान नोंदणी बरोबरच पत्ता आणि नावातील बदल देखील मतदारांना करुन घेता येतील. या शिवाय महाविद्यालयात येखील प्रत्येक मंगळवारी मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेतला जाणार आहे.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येत्या ३० आॅक्टोबर पर्यंत छायाचित्रावर आधारीत मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे. ज्या मतदारांची १ जानेवारी २०१९ रोजी पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार नोंदणी करता येईल. आॅक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी म्हणजेच दिनांक ७, १४, २१ आणि २८ आॅक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहिम दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहतील. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदार नोंदणीचे अर्ज वाटण्यात येतील. तसेच भरलेले अर्ज स्वीकारले देखील जाणार आहेत.  त्याचप्रमाणे १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये आॅक्टोबर महिन्यातील प्रत्येक मंगळवारी विशेष मोहिम घेण्यात येण्यात येईल. अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे.-------------मतदार मोहीमेसाठी महाविद्यालयांची घेणार मदत जिल्ह्यातील नवमतदारांची संख्या वाढावी आणि ९ ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक विषयक जागरुकता निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. त्यासाठी ६ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन प्राचाºयांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार