‘अधिकृत उमेदवारांनाच मते द्या’

By Admin | Updated: December 21, 2015 01:58 IST2015-12-21T01:58:15+5:302015-12-21T01:58:15+5:30

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असे पक्षादेश दोन्ही काँग्रेसनी जारी केले आहेत

'Vote for official candidates' | ‘अधिकृत उमेदवारांनाच मते द्या’

‘अधिकृत उमेदवारांनाच मते द्या’

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असे पक्षादेश दोन्ही काँग्रेसनी जारी केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केवळ अधिकृत उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती, काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मुंबईतून भाई जगताप, अहमदनगर येथून अरुणकाका जगताप, कोल्हापूरात सतेज उर्फ बंटी पाटील, सोलापूरातून दीपकआबा साळुंखे, धुळे-नंदूरबार येथून अमरीश पटेल, अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघातून रवी सपकाळ हे आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.

Web Title: 'Vote for official candidates'