शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

Vote for LMOTY 2019 : कोण आहे अभिनयातील राणी? माधुरी, देविका, प्रिया, वैदेही की कल्याणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 15:19 IST

Vote for LMOTY 2019 : महाराष्ट्राच्या मातीतून वर आलेल्या दिग्गजांनी आपल्या कामगिरीने राज्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवले आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा लोकमत वृत्तसमूहातर्फे दरवर्षी सन्मान करण्यात येतो. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो.

महाराष्ट्राच्या मातीतून वर आलेल्या दिग्गजांनी आपल्या कामगिरीने राज्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवले आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा लोकमत वृत्तसमूहातर्फे दरवर्षी सन्मान करण्यात येतो. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. येत्या 20 फेब्रुवारीला हा पुरस्कार सोहळा मुंबईत रंगणार आहे. लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. यातील चित्रपट क्षेत्रातील महिला प्रवर्गासाठी आपल्या अभिनयानं सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या पाच सुप्रसिद्ध अभिनेत्रींना नामांकन मिळाले आहे.या पाचपैकी तुमच्या पसंतीच्या अभिनेत्रीला मत देऊन  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' 2019ची मानकरी ठरवा. यासाठी मजकुराच्या खालील बॉक्समध्ये तुम्ही मत देऊ शकता. सुरुवातीला या विभागात नामांकन मिळवलेल्या पाच अभिनेत्रींची थोडक्यात माहिती.... 

1.देविका दफ्तरदार : सिनेमा - नाळ  'नाळ' सिनेमातील देविका दफ्तरदार यांची भूमिका वाखाण्याजोगी होती. आपल्या दत्तक मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या आईची भूमिका त्यांनी नाळ सिनेमात साकारली आहे. दत्तक घेतलेल्या मुलाला ती स्वत: पेक्षा जास्त जपत असते. तो दत्तक आहे याची जाणीव देखील त्याला कधी करून देत नाही. पण त्याला तो दत्तक आहे हे कळल्यानंतर तो आईपासून दूर व्हायला लागतो, आपल्या खऱ्या आईला भेटण्याची त्याला ओढ लागते. या सगळ्यात त्याला अनेक वर्षे आपला मुलगा म्हणून सांभाळलेल्या आईची काय अवस्था होते हे देविकाने खूप चांगल्याप्रकारे सादर केले आहे. नाळ सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला व देविकाच्या भूमिकेचे देखील सगळीकडून खूप कौतुक झाले.  

2.कल्याणी मुळ्ये : सिनेमा - न्यूड  आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावं म्हणून एका कॉलेजमध्ये न्यूड मॉडेलचं काम करणा-या अभिनेत्री कल्याणी मुळ्येचं न्यूड या सिनेमामुळे देशातच नव्हे तर जगभर कौतुक झालं. पैशांची गरज असल्याने ती या व्यवसायात ओढली जाते पण याच व्यवसायावर पुढे जाऊन प्रेम करायला लागते. तिच्या आयुष्यातील विविध छटा कल्याणी मुळ्येने ‘न्यूड’ या सिनेमात मांडल्या आहेत. नाशिकमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत हिरे यांच्यासोबत नाटकांमध्ये काम सुरू असतानाच कल्याणीला एनएसडीला (राष्ट्रीय नाट्य विद्यालय) जाण्याची संधी मिळाली होती. दिल्लीला गेल्यानंतर कठोर मेहनत घेऊन कल्याणीने स्वत:ला सिद्ध केले. अनेक हिंदी मराठी नाटकातून काम, मालिका तसेच अनेक जाहिरातींमधूनही ती झळकली आहे. 

3.माधुरी दीक्षित : सिनेमा - बकेट लिस्ट 'बकेट लिस्ट' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमधील धकधक गर्ल माधुरी दीक्षितने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमात तिने मधुरा या गृहिणीची भूमिका साकारली. कुटुंबाची काळजी घेणारी, त्यांच्यातच रमणारी अशी गृहिणी आणि तिच्यावर हृदय प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया झाल्यावर आपल्याला ज्या मुलीचे हृदय मिळाले तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणारी स्त्री अशा एकाच व्यक्तिरेखेच्या दोन वेगळ्या भूमिका तिने खूप चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत. माधुरीच्या चाहत्यांसाठी बकेट लिस्ट हा चित्रपट म्हणजेच पर्वणीच होता.

4.प्रिया बापट : सिनेमा - आम्ही दोघी  'आम्ही दोघी' सिनेमात प्रिया बापटने सावी नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. सिनेमाची कथा अमला आणि सावित्री सरदेसाई (सावी) या दोन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी आहे. दोघीही परस्परविरोधी स्वभावाच्या, मात्र केवळ दैवाने  दोघींची गाठ पडलेली असते. फक्त या दोघींच्याच नाही तर बापलेकी, पती-पत्नी, आई- मुलगी आणि प्रेयसी-प्रियकर अशा ब-याच नातेसंबंधांवर हा सिनेमा भाष्य करतो. प्रियाने वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वत:ला या सिनेमात पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.  

5.वैदही परशुरामी : सिनेमा - ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर दिवंगत अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नीची, कांचन घाणेकर यांची व्यक्तिरेखा वैदेहीने '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमातून साकारली आहे. अल्लड वयातील त्यांची निरागसता, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या वेगवेगळ्या छटा वैदेही परशुरामीने सक्षमपणे रुपेरी पडद्यावर मांडल्या आहेत. वैदेही परशुरामीने 2013 साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मराठी शिवाय तिने हिंदी सिनेमातही काम केले आहे.  

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Maharashtraमहाराष्ट्रMadhuri Dixitमाधुरी दिक्षितPriya Bapatप्रिया बापट