शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 21:32 IST

'मुख्यमंत्री बनने माझे प्राधान्य नाही. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार यावे, हे आमचे प्राधान्य आहे.'

Devendra Fadnavis: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे, हे माझ्ये प्राधान्य नाही, तर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणे प्राधान्य आहे, अशी स्पष्टोक्ती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासोबतच त्यांनी महाविकास आघाडीला आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आव्हानदेखील केले. तसेच, भाजपच्या लोकसभेतील खराब कामगिरीचे कारणही सांगितले. 

व्होट जिहादमुळे लोकसभेला आमचे नुकसान 

टीव्ही9 च्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेवेळी एक फेक नरेटिव्ह चालला गेला. लोकसभेत महाविकास आघाडीला 43.9 टक्के मते मिळाली, तर महायुतीला 43.6 टक्के मते मिळाली. पॉइंट तीन टक्क्यांनी ते आमच्या पुढे होते. पण जागांमध्ये मोठी उलटफेर झाली. त्यात दोन कारणे आहेत. संविधान बदलले जाईल, आरक्षण जाईल असे सांगितले जात होते. आम्ही ते काऊंटर करण्यात कमी पडलो. तसेच, महाराष्ट्रात आम्हाला आमचा अतिआत्मविश्वास नडला. महाराष्ट्रात व्होट जिहादमुळे आमचे नुकसान झाले. धार्मिक स्थळांना आमच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले, पण व्होट जिहादच्या माध्यमातून जे काही झाले, ते आता विधानसभा निवडणुकीत चालणार नाही. आता महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन होईल. आता परिस्थिती बदलली आहे. संविधान बदलणार नाही, आरक्षणाला धोका नाही हे लोकांना माहीत आहे. आपल्या हातात संविधान घेऊन जाणारे राहुल गांधी आरक्षण संपवले पाहिजे, असे परदेशात जाऊन सांगतात. आरक्षण संपवण्याचा फॉर्म्युला सांगतात आणि नाना पटोले त्यांचे समर्थन करतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार?यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाबाबत महत्वाचे भाष्य केले. मुख्यमंत्री बनने माझे प्राधान्य नाही. पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार यावे, हे आमचे प्राधान्य आहे. महाविकास आघाडी जेव्हा त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करेल, त्याच्या 15 मिनिटांत आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करू. आमचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्याकडे चेहरा आहे, पण विरोधकांकडे कोणता चेहरा आहे, हे त्यांना विचारा. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आमचे पक्षश्रेष्ठी बसून घेतीत. जो निर्णय घेतील, त्यांच्यासोबत आम्ही राहू, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस