ऑनलाइन लोकमतखामगाव, दि. 6- जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. ते खामगाववरून नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाला भेट देण्याकरिता निघाले असता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवून त्यांना कांदा भेट दिला. स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी कैलास फाटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश महाजनांभोवती स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांची घेराव घातला होता.
‘स्वाभिमानी’ च्या कार्यकर्त्यांनी जलसंपदामंत्र्यांना दिला कांदा भेट
By admin | Updated: May 6, 2016 17:12 IST