आगळय़ावेगळय़ा विचाराचे स्वयंसेवक
By Admin | Updated: June 4, 2014 01:16 IST2014-06-04T01:16:02+5:302014-06-04T01:16:02+5:30
गोपीनाथ मुंडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. पण नागपुरात क्वचितच कुणी त्यांना अध्र्या चड्डीत पाहिले असेल.

आगळय़ावेगळय़ा विचाराचे स्वयंसेवक
>मोरेश्वर बडगे - नागपूर
गोपीनाथ मुंडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. पण नागपुरात क्वचितच कुणी त्यांना अध्र्या चड्डीत पाहिले असेल. दिल्लीचे नेते नागपुरात येतात तेव्हा संघ मुख्यालयात हमखास जातात, मुंडे क्वचितच गेले असतील. पण म्हणून संघ विचारावरची त्यांची श्रद्धा तसूभरही कमी झालेली नव्हती. प्रमोद महाजनांमुळे गोपीनाथ मुंडे यांचा संघाशी संबंध आला. तसे पाहिले तर वेगळ्या विचाराचे स्वयंसेवक होते. नागपुरात तसेही मुंडे फार येत नसत. विधानसभा अधिवेशनानिमित्ताने त्यांचे येणो होई. पुढे ते दिल्लीला गेले तेव्हा नागपुरात येणो आणखी कमी झाले. पण जेव्हा केव्हा नागपुरातल्या खास बैठकीत संघाचा विषय निघे तेव्हा मुंडे मनातले सारे ओकून मोकळे होत. संघाने आपले हेडक्वार्टर दिल्लीला हलवावे, म्हणजे मोठी लढाई खेळता येईल, असे त्यांनी एकदा बोलून दाखवले होते.
प्रत्येक पुढा:याचे काही खास लोक प्रत्येक मोठय़ा शहरात असतात. मुंडेंचे नागपुरात भाजपामध्ये असे खास कुणी नव्हते. विशेष प्रसंगी पदाधिकारी स्वागताला यायचे तेवढेच. मात्र खा. अजय संचेती घराण्याशी त्यांचे जुने घरोब्याचे संबंध होते. मुंडे नागपुरात येत असले की, संचेती स्वत: वापरतात ती गाडी त्यांना घ्यायला जायची. मुंडेंची नागपुरात बैठक असायची असे आणखी एक ठिकाण म्हणजे डॉ. विलास डांगरे. गप्पा झाल्यावर स्वत:साठी औषध सोबत घ्यायला मुंडे विसरत नसत.
नितीन गडकरींशी मुंडेंचे जमत नव्हते. कधी जाहीरपणो तर कधी फोनवर हे दोघे भांडताना अनेकांनी पाहिले आहे. पण या माणसाची ब्यूटी पाहा. मध्यंतरी मुंडे राजीनामा द्यायला निघाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भाचे बहुसंख्य आमदार मुंडेंच्या पाठीशी उभे राहिले होते. मुंडे मनात काही ठेवत नसत. भांडून मोकळे होत. एकदा ते म्हणालेही, ‘भविष्यात मी व गडकरी एवढे जिगरी दोस्त होऊ की तुम्हीही तोंडात बोटं टाकाल.’
शेतकरी आत्महत्या, भारनियमन असूनही विदर्भातले शेतकरी काँग्रेसला मतं टाकत तेव्हा मुंडे कमालीचे संतापत. अलीकडे हवा बदलल्याने ते खुशीत होते. गेल्या अधिवेशनकाळात नागपूरला मुंडे आले, तेव्हा ‘लोकमत’ला आले होते. निघताना सहज मुंडे म्हणाले, ‘पुढच्या खेपेला ‘रामगिरी’वर भेटू.’ आता ती भेट होणो नाही़़़