मराठा आरक्षणासाठी उलटी पदयात्रा
By Admin | Updated: March 1, 2017 05:20 IST2017-03-01T05:20:39+5:302017-03-01T05:20:39+5:30
पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील सर्वसामान्य कुटुंबातील बापूराव गुंड यांनी उलटी पदयात्रा सुरू केली आहे़

मराठा आरक्षणासाठी उलटी पदयात्रा
राहुरी (अहमदनगर) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील सर्वसामान्य कुटुंबातील बापूराव गुंड यांनी उलटी पदयात्रा सुरू केली आहे़ मंगळवारी गुंड यांचे राहुरीत स्वागत करण्यात आले़
दीड महिन्यात गुंड हे पुणे ते दिल्ली उलटी पदयात्रा करतील. मराठा आरक्षणासह ते राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे १० मागण्या करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वी मराठा आरक्षणासाठी पुणे ते मुंबई अशी उलटी पदयात्रा करत त्यांनी मुख्यमंत्री व राज्यपालांना निवेदन दिले होते. (प्रतिनिधी)