वडाळा ते लोअर परेल मोनोरेल प्रवास लवकरच
By Admin | Updated: September 10, 2016 18:31 IST2016-09-10T18:31:55+5:302016-09-10T18:31:55+5:30
वडाळा ते लोअर परेलदरम्यान मोनो धावणार असून 9 किमीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

वडाळा ते लोअर परेल मोनोरेल प्रवास लवकरच
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मेट्रोनंतर मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असलेली मोनो लवकरच वडाळा ते लोअर परेल दरम्यान ऐटीत धावताना दिसणार आहे. मोनोची वडाळा ते लोअर परेल 9 किमीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. सध्या मोनो फक्त चेंबूर ते वडाळापर्यंत धावत आहे.
ताशी 15 किमी प्रतितास वेगाने ही चाचणी घेण्यात आली. वडाळा डेपो, जीटीबी नगर, अँन्टॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परेल या स्थानकांदरम्यान ही चाचणी घेण्यात आली. सध्या वडाळा ते लोअर परेल प्रवास करायचा असल्यास मुंबईकरांना बस किंवा टॅक्सीचाच पर्याय आहे. टॅक्सीचे भाडे आणि बसमध्ये प्रवास करताना होणारी वाहतूक कोंडी मुंबईकरांचा मनस्ताप वाढवत असते. अशामध्ये मोनो सुरु झाल्यास मुंबईकरांना आरामात प्रवास करता येणं शक्य होणार आहे.