साहित्य संमेलनाचे विठ्ठलाला आवतण
By Admin | Updated: December 8, 2014 02:55 IST2014-12-08T02:55:02+5:302014-12-08T02:55:02+5:30
साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचे उद्योग, घुमानवरून रंगलेला वाद, प्रकाशकांची नाराजी हे संमेलन आणि वादाचे समीकरण साहित्यविश्वाला नवे

साहित्य संमेलनाचे विठ्ठलाला आवतण
मुंबई : साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचे उद्योग, घुमानवरून रंगलेला वाद, प्रकाशकांची नाराजी हे संमेलन आणि वादाचे समीकरण साहित्यविश्वाला नवे नाही, मात्र यापलीकडे जाऊन संमेलनाच्या तयारीचा रेटा सुरूच आहे. ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आवतण पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईला देण्यात आले.
८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ एप्रिल, २०१५ रोजी होणार आहे. पंढरपूर वारीतील संमेलनाच्या प्रतिनिधींनी संत नामदेवांचे दैवत असणाऱ्या विठ्ठल-रखुमाईच्या चरणी घुमानची निमंत्रण पत्रिका अर्पण केली. संमेलनाच्या प्रतिनिधींनी संत नामदेवांचे वंशज ज्ञानेश्वर तुळशीदास नामदास (रेळेकर) यांनाही घुमानचे विशेष निमंत्रण देण्यात आले. (प्रतिनिधी)