रोषणाइने उजळले विठ्ठल मंदिर
By Admin | Updated: July 13, 2016 13:02 IST2016-07-13T13:02:13+5:302016-07-13T13:02:13+5:30
आषाढी वारीच्या निमित्ताने आज विठ्ठल रुक्मिणी मंदिराल विद्युत रोषणाइ करण्यात आली आहे. त्यामुळे अवघे विठ्ठल मंदिर उजळून निघाले आहे.

रोषणाइने उजळले विठ्ठल मंदिर
दीपक होमकर
पंढरपूर, दि. १३ - आषाढी वारीच्या निमित्ताने आज विठ्ठल रुक्मिणी मंदिराल विद्युत रोषणाइ करण्यात आली आहे. त्यामुळे अवघे विठ्ठल मंदिर उजळून निघाले आहे.
मंदिराच्या समोरील बाजू, नामदेव पायरी, रुक्मिणी द्वार, पश्चिम द्वार, यासह मंदिरातील आतील गरुड आणि हनुमान मंदिरावरही लाईटच्या माळा सोडण्यात आल्या आहेत. शिवाय सभा मंडपात तर लाईटच्या माळांचा जणू छत घातला आहे. त्यामुळे रंगीबेरंगी विद्युत झोताने मंदिर उजळले आहे.
मंदिराशिवाय द्यानेश्वर सभा मंडप आणि जगतगुरु श्री संत तुकाराम भवनलाही आकर्षक आणि रनिंग लाईट्स च्या माळानी सजविण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरासह मंदिराचा परिसरही जणू लक्ष लक्ष लायटिंगने उजळू निघाले आहे.