शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासकीय महापूजेवेळी विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 12:50 IST

Ashadhi Ekadashi 2023: राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत असल्याचे सांगितले जात आहे.

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. आषाढी वारीनिमित्त वारकरी एक एक टप्पा पंढरपूरकडे सरकत आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातच आता वारकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. यंदाच्या वर्षीपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवेळी विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरू राहणार आहे. हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची.

आषाढी एकादशीसाठीपंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात येत होती. त्यामुळे आलेल्या लाखों वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत असे. रांगेतील कालावधी चार तासांनी वाढायचा. त्यामुळे वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी फार वेळ लागत असे. ही गैरसोय टाळण्यासाठी आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने ही खुशखबर दिली आहे.

आषाढी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात. जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात होत असतो. यावेळी आषाढी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था केल्याने पर्वणी काळात जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन होणार  आहे. आषाढी एकादशी दिवशी दर्शन मिळावे यासाठी ३०-३० तास भाविक दर्शन रांगेत उभे असतात. राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात. राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत आहे. 

दरम्यान, हा निर्णय जाहीर केल्याने आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच देवाचे दर्शन घेता येणार आहे. याचसोबत आषाढी एकादशीला मानाच्या दिंड्यांचे देण्यात येणाऱ्या दर्शन पासेसशिवाय कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पहाटेची शासकीय महापूजा संपल्यानंतर दिवसभर विठुरायाचे दर्शन पर्वणी काळात घेता येणार आहे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpurपंढरपूर