एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

By Admin | Updated: November 6, 2015 02:08 IST2015-11-06T02:08:05+5:302015-11-06T02:08:05+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५०० रुपये,तर अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते

Visit to ST employees Diwali | एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

- रावतेंनी केली घोषणा

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५०० रुपये,तर अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
मुंबईतील बेस्ट सेवा तोट्यात असली तरी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली जाते. त्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही ती द्यावी, असे निर्देश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास अनुमती दिल्यानंतर हा निर्णय झाल्याचे रावते म्हणाले.
आजच्या निर्णयाचा फायदा एसटीचे ३६ हजार ९८३ चालक आणि ३६ हजार ४३५ वाहकांसह १ लाख ७ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांना होणार आहे. या निर्णयाने महामंडळाच्या तिजोरीवर ७५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Visit to ST employees Diwali