गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना एसटीची भेट

By Admin | Updated: July 14, 2014 03:36 IST2014-07-14T03:36:58+5:302014-07-14T03:36:58+5:30

गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटी महामंडळाच्या वतीने मुंबई आणि ठाणे परिसरातून २४ ते २८ आॅगस्टदरम्यान १ हजार ८९५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे

Visit to the Konkan residents for the festival of Ganesh festival | गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना एसटीची भेट

गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना एसटीची भेट

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटी महामंडळाच्या वतीने मुंबई आणि ठाणे परिसरातून २४ ते २८ आॅगस्टदरम्यान १ हजार ८९५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, जादा बसेसची मागणी आल्यास ती पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. गतवर्षी गणेशोत्सवानिमित्त १ हजार ७४१ जादा बसेस सोडल्या होत्या.
एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल आगारांतर्गत मुंबई सेंट्रल, साईबाबा मार्ग, काळाचौकी, गिरगाव, कफपरेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी ही वाहतुकीची ठिकाणे आहेत. परळ आगारांतर्गत परळ, सेनापती बापट मार्ग, मांगल्य हॉल-जोगेश्वरी ही वाहतुकीची ठिकाणे आहेत. कुर्ला नेहरूनगर आगारांतर्गत कुर्ला नेहरूनगर, बर्वे मार्ग / सर्वोदय रुग्णालय (घाटकोपर), टागोरनगर (विक्रोळी), घाटला (चेंबूर), डी.एन. नगर, गुंदवली (अंधेरी), आनंदनगर (सांताक्रुझ), विलेपार्ले, खेरनगर (वांद्रे) आणि सायन ही वाहतुकीची ठिकाणे आहेत. ठाणे-१ या आगारांतर्गत भार्इंदर, लोकमान्यनगर, श्रीनगर, विटावा, नॅन्सी कॉलनी (बोरीवली), मालाड, डहाणूकर वाडी / चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्प सिद्धी गणेश मंदिर (गोरेगाव) ही वाहतुकीची ठिकाणे आहेत. ठाणे-२ या आगारांतर्गत ठाणे-खोपट, मुलुंड (पूर्व), भांडुप (पूर्व आणि पश्चिम) ही वाहतुकीची ठिकाणे आहेत.
विठ्ठलवाडी आगारांतर्गत विठ्ठलवाडी, बदलापूर, अंबरनाथ ही वाहतुकीची ठिकाणे आहेत. कल्याण आगारांतर्गत कल्याण, डोंबिवली (पूर्व आणि पश्चिम), वसई आगारांतर्गत वसई, अर्नाळा आगारांतर्गत अर्नाळा आणि नालासोपारा आगारांतर्गत नालासोपारा ही वाहतुकीची ठिकाणे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Visit to the Konkan residents for the festival of Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.