वाशीम ते मुंबई सायकल प्रवास करुन घेतली लालबागच्या राजाची भेट
By Admin | Updated: September 14, 2016 19:35 IST2016-09-14T19:34:08+5:302016-09-14T19:35:48+5:30
नारायण व्यास आणि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी महेश धोंगडे यांनी वाशीम ते मुंबई असा तब्बल 600 किमी सायकल प्रवास करुन मुंबई येथे लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

वाशीम ते मुंबई सायकल प्रवास करुन घेतली लालबागच्या राजाची भेट
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 14 - स्थानिक राजस्थान आर्य महाविद्यालयातील कर्मचारी नारायण व्यास आणि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी महेश धोंगडे यांनी वाशीम ते मुंबई असा तब्बल 600 किमी सायकल प्रवास करुन मुंबई येथे लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यातून सायकल चालविण्यातुन पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
सायकल चालविण्याचा छंद असलेले नारायण व्यास यांनी यापुर्वीही अनेक दुरदुरच्या क्षेत्रांना सायकल प्रवास करुन भेटी दिल्या. या पाठीमागे त्यांची भूमिका ही पर्यावरणपुरक आहे. त्यांच्या या सायकल चालविण्याच्या छंदामुळे अनेकांना त्यांच्यापासून सायकल चालविण्याची प्रेरणा मिळाली. वाशीम ते लालबाग असे 600 किमीचे अंतर त्यांनी तब्बल तीन दिवसात पार केले. त्यांच्या या पर्यावरणपुरक उपक्रमाची नोंद घेवून राजस्थान आर्य महाविद्यालयाने नारायण व्यास व महेश धोंगडे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एम. संचेती यांनी सत्कार केला