दलाई लामा यांची त्र्यंबकला भेट

By Admin | Updated: August 31, 2015 01:41 IST2015-08-31T01:41:34+5:302015-08-31T01:41:34+5:30

एकमेकांविषयी आदर ठेवा. सर्व धर्म हीच शिकवण देतात, असा संदेश बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी रविवारी त्र्यंबकेश्वर येथे दिला

Visit of the Dalai Lama to Trimbakk | दलाई लामा यांची त्र्यंबकला भेट

दलाई लामा यांची त्र्यंबकला भेट

त्र्यंबकेश्वर : एकमेकांविषयी आदर ठेवा. सर्व धर्म हीच शिकवण देतात, असा संदेश बौद्ध धर्मगुरू दलाई
लामा यांनी रविवारी त्र्यंबकेश्वर येथे दिला.
रमणरेती येथील काव्यगुरू शरणानंद यांचा त्र्यंबकेश्वर येथील आश्रमास दलाई लामा यांनी भेट दिली. उदासिन बडा आखाड्याचे महामंडलेश्वर आचार्य यांच्या आमंत्रणावरून दलाई लामा येथे आले आहेत.
रविवारी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याविषयी चर्चा केली. यावेळी कविगुरू शरणानंद, स्वामी परमानंद, स्वागी ज्ञानानंद आदी उपस्थित होते. लामा यांचे त्र्यंबकेश्वरला आगमन झाल्यानंतर ते थेट कविगुरुंच्या आश्रमावर गेले. विविध धर्मगुरुंनी त्यांच्याशी चर्चा केली. (वार्ताहर)

Web Title: Visit of the Dalai Lama to Trimbakk