वीरेंद्र तावडेला न्यायालयात २१ जानेवारीला हजर करा
By Admin | Updated: January 4, 2017 02:47 IST2017-01-04T02:47:02+5:302017-01-04T02:47:02+5:30
अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला २१ जानेवारीला कोल्हापुरातील न्यायालयात हजर करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिले.

वीरेंद्र तावडेला न्यायालयात २१ जानेवारीला हजर करा
कोल्हापूर : अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला २१ जानेवारीला कोल्हापुरातील न्यायालयात हजर करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिले.
तिसरा संशयित आरोपी विनय पवार (रा. उंब्रज, जि. सातारा) व चौथा सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) हे दोघे अजूनी फरार त्यांच्या अटकेची प्रक्रिया पोलिसांनी सुरू करावी, अशा सूचनाही बिले यांनी दिल्या. त्यामुळे समीर गायकवाड व तावडेची एकत्रित सुनावणी होणार आहे. गायकवाड व तावडे याच्या हजर अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. पानसरे हत्या प्रकरणी तावडे याच्यावर डिसेंबर २०१६ ला दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून तो सध्या येरवडा कारागृहात आहे. तावडेचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी तावडेला दोषारोपपत्रातील माहिती सांगायची आहे तसेच हा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग करायचा आहे. त्यामुळे तावडेला न्यायालयात हजर करावे, असा अर्ज दिला होता. त्यावर सुनावणी झाली. (प्रतिनिधी)
- समीर गायकवाड याच्यावर डिसेंबर २०१५ ला न्यायालयात दोषारोपपत्र (चार्टशीट) दाखल झाले आहे; पण,अद्याप ते निश्चित झालेले नाही. यावर न्यायालयाने २१ जानेवारीला चार्जफ्रेमवर ही सुनावणी होणार असल्याचे सांगितले.