शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये आरपीआय तालुकाध्यक्षाने केली पोलीस अधिका-याला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 17:21 IST

एकवीस दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी  बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये

विरार, दि. 15 - सात दिवसाच्या गणपती विसर्जनाच्यावेळी डीजे बंद करण्याच्या कारणावरुन विरार मध्ये एका महिला पोलिस अधिका-याला अश्लिल हातवारे करुन विनयभंग केल्याची घटना ताजीच असतानाच, गुरुवारी रात्री एकवीस दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी  बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे. आरपीआय गटाच्या वसई तालुका अध्यक्षाने दारुच्या नशेत अश्लिल भाषेत वर्तन करुन ही मारहाण केली असल्याचं मोबाइल क्लिप मधून समोर आलं आहे.  

विरार पूर्व मनवेलपाडा तलावावर बंदोबस्तासाठी असलेल्या तुकाराम दराडे या पोलिसाला ही मारहाण करण्यात आली आहे. तसंच हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. मनवेल पाडा तलावावर गुरूवारी (14 सप्टेंबर) एकवीस दिवसाच्या दोन गणपतींचं विसर्जन होतं. एका गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर संत नगर येथील  दुसरा गणपती बारा वाजता तलावावर पोहचला होता.

न्यायालयाच्या निर्देशानुसार दहाच्या नंतर वाद्य वाजविण्यास बंदी असल्याने बंदोबस्तावरील पोलिसांनी वाद्य बंद करायला सांगितले होते. याच कारणावरुन गणेशभक्त आणि पोलिसांत वादावादी झाली होती. याच वादावादीतून मी आरपीआय वसई तालुका अध्यक्ष आहे. असे जोरजोराने ओरड़ून सांगत चक्क दराडे नावाच्या पोलिसांच्या कानशिलात लगावली. व्यंकटेश एस. रायल्ला असं मारहाण करणा-या व्यक्तीचं नाव आहे. तो आरपीआय गटाचा वसई तालुका अध्यक्ष आहे. विरारचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनूस शेख यांनाही आरेरावीची भाषा वापरत असताना मोबाइल क्लिपमध्ये दिसून येत आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस