विरार - दुस-या तरुणासोबत फिरताना पाहिल्याने केली प्रेसयीची हत्या
By Admin | Updated: July 20, 2016 09:00 IST2016-07-20T09:00:39+5:302016-07-20T09:00:39+5:30
आपल्या प्रेयसीला दुस-या तरुणासोबत फिरताना पाहिल्याने रागावलेल्या तरुणाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे

विरार - दुस-या तरुणासोबत फिरताना पाहिल्याने केली प्रेसयीची हत्या
>ऑनलाइन लोकमत -
विरार, दि. 20 - आपल्या प्रेयसीला दुस-या तरुणासोबत फिरताना पाहिल्याने रागावलेल्या तरुणाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. किंजल शहा असं या तरुणीचं नाव असून पोलिसांना मंगळवारी तिचा मृतदेह आढळला होता. पोलीस तपासात किंजलची हत्या झाली असून प्रियकर देवेंद्र यानेच ही हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी आरोपी देवेंद्रला अटक केली आहे.
किंजल सोमवारपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रारदेखील केली होती. मंगळवारी राहत्या इमारतीच्या शेजारीच किंजलचा मृतदेह सापडला होता. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. हत्या करुन किंजला मृतदेह इमारतीजवळ टाकला असल्याचा पोलिसांना संशय होता. अखेर तुलिंज पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे.
आरोपीचं नाव देवेंद्र दिनकर भोसले याने अर्नाळा पोलिसांसमोर किंजलचा खून केल्याचं कबूल केलं आहे. देवेंद्र नालासोपाऱ्यातील मोरेगांवमधील एकविरा अपार्टमेंटमध्ये राहतो.
देवेंद्र आणि किंजल यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. किंजलला एका दुसऱ्या तरुणाबरोबर फिरताना पाहिल्यानं देवेंद्रचा राग अनावर झालाय हत्येच्या दिवशी देवेंद्र किंजलला घेऊन तुंगारेश्वर येथे गेला होता. त्यानंतर त्यानं तिला तिथल्या पाण्यात बुडवून तिची हत्या केली आणि तिला रिक्षात बसवून तिचा मृतदेह सोसायटीजवळ फेकून दिला.