शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल व्हिडीओ ही लहान बाब, बदनामी करणाऱ्यांना न्यायालयात खेचू : कोकाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:13 IST

आपली भूमिका विशद करीत माणिकराव कोकाटे यांनी कृषिमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मंगळवारी स्पष्टपणे नकार दिला. 

नाशिक : मी एखाद्या महिलेचा विनयभंग केला आहे का? मी अन्य काही गंभीर गुन्हा केला आहे की, कुणा शेतकऱ्याला फसवलंय, असे काय घडलेलं आहे, की मी राजीनामा देऊ? मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडीओ खूप लहान बाब आहे. कारण यामागे  षड्यंत्र आहे, अशी भूमिका विशद करीत माणिकराव कोकाटे यांनी कृषिमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मंगळवारी स्पष्टपणे नकार दिला. मला राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फाेन आलेला नाही. माध्यमांमध्ये मात्र तसे चित्र रंगविले गेले. सभागृहातील मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल करून नंतर माझी बदनामी करणाऱ्यांना मी न्यायालयात खेचणार आहे, असे कोकाटे पत्रपरिषदेत म्हणाले. मी मोबाइल हातात घेतला तेव्हा रमी गेमची जाहिरात आली. मी ती स्कीप करीत होतो. या संपूर्ण प्रकरणावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र देणार आहे. मी कोणत्याही चौकशीस तयार आहे. सभागृहात माझा ‘तो’ व्हिडीओ कोणी काढला, याचाही तपास सभापतींनी करावा, असेही कोकाटे म्हणाले. 

...तर मी राजीनामा देईनरमीतून मी पैसे हरलो, जिंकलो असेन, तर बँक डिटेल तपासावे. सीडीआर तपासावा. मी सभागृहात एकदा तरी रमी गेम खेळलो, हे सिद्ध झाले, तर मी नागपूर अधिवेशनादरम्यान राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, विरोधकांचा सीडीआर तपासावा, असे आव्हान कोकाटे यांनी दिले.

माध्यमांवर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांचे वक्तव्यकोकाटे यांनी सभागृहात गेम खेळला असेल तर हे चुकीचेच आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले हाेते. याबाबत माध्यमांमधील बातम्यांवर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांनी तसे विधान केले असावे,  असे कोकाटे म्हणाले.

जाहिरात स्किप करायला ४२ सेकंद लागतात का?सभागृहात आपण मोबाइल बघत होतो तेव्हा कामकाज संपले होते, तसेच आपण जाहिरात स्कीप करत होतो, असा खुलासा करणाऱ्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे यासंदर्भातील दोन व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट केले. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, सभागृहाचे कामकाज संपले होते हे कृषिमंत्री महोदयांचे विधान खोटे आहे. उलट आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरे देण्याच्या विषयावर चर्चा सुरू होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा कोणती जाहिरात स्कीप करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो?” विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसेच काहीसं कोकाटेंचे झालेय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असे वाटत होते पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेMaharashtraमहाराष्ट्र