शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत बॅडमिंटन खेळताना शॉक लागल्यानं १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नालासोपाऱ्यातील घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:34 IST

Nala Sopara Class 10 student electrocuted: नालासोपारा येथील एका गृहनिर्माण सोसायटीत बॅडमिंटन खेळत असताना शॉक लागल्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

मुंबईजवळील नालासोपारा येथील एका गृहनिर्माण सोसायटीत बॅडमिंटन खेळत असताना शॉक लागल्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश संतोष साहू असे शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता दहावीत शिकत होता. शुक्रवारी संध्याकाळी ७.०० वाजताच्या सुमारास आकाश आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत असताना त्यांचा शटलकॉक इमारतीच्या खिडकीवर अडकला. शटलकॉक काढण्यासाठी आकाश खिडकीवर चढला आणि तो जिवंत वायरच्या संपर्कात आला. सुरुवातीला त्याच्या आकाशला नेमके काय झाले, हे समजले नाही. परंतु, आकाशच्या मित्राने त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही शॉक लागला. सुदैवाने, तो थोडक्यात बचावला. यानंतर आकाश जमीनीवर कोसळला. 

सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भयानक क्षण कैद झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे गृहनिर्माण सोसायटीतील विद्युत सुरक्षा मानकांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कळवा: स्ट्रीट लाईटचा शॉक लागून ८ वर्षांचा मुलगा जखमीठाण्यातील कळवा येथील पारसिक नगर भागात शुक्रवारी रात्री स्ट्रीट लाईटचा शॉक लागून एका आठ वर्षांच्या मुलाला दुखापत झाली, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचा वीज विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्ट्रीट लाईटचा वीजपुरवठा खंडित केला. या घटनेत मुलाच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आणि त्याच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराMaharashtraमहाराष्ट्र