औरंगाबादमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड
By Admin | Updated: January 31, 2017 14:35 IST2017-01-31T14:35:31+5:302017-01-31T14:35:31+5:30
औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. जालना रोड्वर आंदोलनादरम्यान दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

औरंगाबादमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 31 - औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. जालना रोड्वर आंदोलनादरम्यान दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शहरातील प्रमुख आकाशवाणी चौक, सिड्को बसस्टँड, महानुभाव आश्रम चौक, केंब्रिज शाळा चौक, वाळुजच्या ओयासिस चौक, लिंबेजळगाव चौक आणि दौलताबाद चौकात जोरदार रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी भगवे झेंडे आणि फलक घेऊन आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. हा रास्ता रोको चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. यावेळी शांततेत आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीमार केला. हर्सूलमधे चक्काजाम आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.