शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

CAA : देशातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं मोठं अपयश; सुप्रिया सुळेंनी केली अमित शहांवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 17:47 IST

Citizen Amendment Act : दिल्लीत विद्यापीठाच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला

बारामती - सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात जो हिंसाचार सुरु आहे हे केंद्रीय गृहमंत्रालयाच अपयश आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहांना लगावला आहे. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. देशात पहिल्यांदाच एवढा अत्याचार पाहिला असून देशाला आणि राज्याला शांततेची गरज असल्याचं त्यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीत विद्यार्थ्यांना जी मारहाण करण्यात आली या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हायला हवी. देशात अनेक प्रश्न आणि समस्या असताना यावरुन लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील विधिमंडळात सुरु असणाऱ्या विरोधकांच्या गोंधळाचाही सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला. मागील ५ वर्षात केलेला गोंधळ बाहेर येऊ नये या भीतीनेच विरोधत सभागृहात गोंधळ घालत आहेत असा आरोप त्यांनी केला. 

दिल्लीत विद्यापीठाच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. ग्रंथालय हे शांततेचं ठिकाण असतं. मात्र पोलिसांनी त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. दिल्लीत झालेला हिंसाचार देशाच्या गृह मंत्रालयाचं अपयश आहे असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. त्याचसोबत मुंबईत लोकल रेल्वेवर असणारा भार लक्षात घेता प्राधान्याने प्रवाशांच्या सुरक्षितेकडे लक्ष देणं गरजेचे आहे. बुलेट ट्रेनपेक्षा लोकांचा जीव महत्वाचा आहे. बुलेट ट्रेनचा निधी मुंबई उपनगरासाठी द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. 

दरम्यान, नागपूर अधिवेशनातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना केंद्रातील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देशात आणि राज्यात अस्थिरतेचे, अशांततेचं वातावरण निर्माण केलं जातं. दिल्लीच्या विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर गोळीबार केला जालियनवाला बाग हत्याकांडासारखं वातावरण देशात निर्माण केलं जातंय का याची शंका उपस्थित होते. संपूर्ण जगात भारत सर्वाधिक जास्त तरुण असलेला देश असणार आहे. त्यामुळे ही युवाशक्ती आहे, बॉम्ब आहे याची वात पेटवण्याचा प्रयत्न करु नये अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर घणाघात केला.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmit Shahअमित शहाSupriya Suleसुप्रिया सुळेagitationआंदोलनdelhiदिल्ली