शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हक्कभंगावर हक्कभंग! राऊत, शिंदेंपाठोपाठ दानवे, अजित पवार यांच्याविरोधातही सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 06:41 IST

संजय राऊत यांनी ७ दिवसांत लेखी खुलासा करावा; उपसभापतींचा आदेश 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘विधिमंडळ हे चोरमंडळ आहे’, या खासदार संजय राऊत यांच्या विधानावरून झालेल्या हक्कभंगाच्या मागणीवर गुरुवारी विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमोर सुनावणी झाली. राऊत यांचे विधान लोकप्रतिनिधींचा अवमान करणारे आहे. विधिमंडळाच्या परंपरा पायदळी तुडविणारे हे विधान आहे. विशेषाधिकारभंगाच्या या प्रकरणावर चौकशी होणे आवश्यक असून, याप्रकरणी वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी राऊत यांनी सात दिवसांत लिखित स्वरुपात खुलासा करावा, असे आदेश उपसभापती गोऱ्हे यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील हक्कभंगावर सुनावणी झाल्यानंतर उपसभापतींनी राऊत यांच्याविषयी निर्णय दिला. विधानसभेची हक्कभंग समिती स्थापन झाल्यानंतर आता विधान परिषदेचीही हक्कभंग समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती नेमण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे उपसभापतींनी सांगितले. त्यानुसार समिती स्थापन झाल्यावर हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवायचे किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.

त्याचप्रमाणे राऊत हे राज्यसभेचे सदस्य असल्याने संसद सदस्यांबद्दल हक्कभंगाचा प्रश्न उपस्थित झाल्यास यासंदर्भातील सूचना राज्यसभेच्या सभापतींकडे पाठविण्याची प्रथा असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली.

चहापानावर बहिष्कार टाकताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचा उल्लेख ‘महाराष्ट्रद्रोही’ असा केला होता. त्यावरून त्यांच्याविरोधात हक्कभंग सूचना दाखल करण्यात आली. तसेच, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधातही हक्कभंग सूचना देण्यात आली. या दोन्ही हक्कभंग सूचनांवर शिमग्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपसभापतींनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmbadas Danweyअंबादास दानवेvidhan sabhaविधानसभाSanjay Rautसंजय राऊत