विंधण विहिरींना मिळाला मुहूर्त

By Admin | Updated: June 8, 2016 02:07 IST2016-06-08T02:07:04+5:302016-06-08T02:07:04+5:30

पनवेल तालुक्यातील ३७ गावे पाणीटंचाईने त्रस्त झाली आहेत

Vindhuna wells get Muhurat | विंधण विहिरींना मिळाला मुहूर्त

विंधण विहिरींना मिळाला मुहूर्त


पनवेल : पनवेल तालुक्यातील ३७ गावे पाणीटंचाईने त्रस्त झाली आहेत. यातील २ गावे आणि ११ वाड्यांतील १३ विंधण विहिरींना मंजुरी मिळाली होती, मात्र त्या खोदण्याकरिता एजन्सीच मिळत नव्हती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर संबंधित प्रशासनाला जाग आली असून १२ ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यात आल्या आहेत. त्यापैकी ११ विंधण विहिरींना पाणी लागले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे.
तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाण्याच्या टंचाईने हैराण आहेत. आदिवासी आणि दुर्गम भागात निर्माण होणारी पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात तालुक्यातील ३६ गावे आणि वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. यात १३ विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आली होती.
एजन्सीच मिळत नसल्याने विंधण विहिरी खोदण्याचे काम महिन्याभरापासून रखडले होते. १२ पैकी ११ विहिरींना पाणी लागल्याची माहिती पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता आर.डी.चव्हाण यांनी दिली. (वार्ताहर)
येथे खोदल्या विहिरी
तालुक्यातील मालडुंगे येथील देहरंग व धोदाणी ही दोन गावे तसेच बेलवाडी (नानोशी), गराडा (नानोशी), सावरमाळ (नानोशी), कामटवाडी (नानोशी), धामोळे (ओवे), बुर्दुलवाडी (तुर्भे), आदिवासी वाडी (मोरबे), ठाकूरवाडी (वलप), भल्याची वाडी (शिरवली), पेरूची वाडी (चावणे) या ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यात आल्या आहेत.

Web Title: Vindhuna wells get Muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.