शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

विंदा करंदीकर जन्मशताब्दीवर्ष: स्वेदगंगेपासून मृदगंधपर्यंत 'सतत देत राहाणारा' कवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 13:36 IST

विंदांना 2006 साली 39 वा ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना केशवसुत पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरु लिटररी अॅवॉर्ड, कबिर सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले होते.

मुंबई- गोविंद विनायक करंदीकर असं मूळ नाव असलं तरी त्यांना सर्व वाचकांनी आणि कविताप्रेमींनी विंदा करंदीकर अशाच नावाने ओळखलं. 23 ऑगस्ट 1918 रोजी सिंधुदुर्गातील एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या विंदांचे हे जन्मशताब्दी वर्ष. आयुष्यभरात एक शिक्षक, कवी, लेखक, अनुवादक आणि साहित्य आस्वादक अशा निरनिराळ्या भूमिका पार पाडणाऱ्या विंदांच्या अनेक कविता आजही आपल्या ओठांवर आहेत. विंदांना 2006 साली 39 वा ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना केशवसुत पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरु लिटररी अॅवॉर्ड, कबिर सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले होते. स्वेदगंगा, मृदगंध, जातक, विरुपिका, धृपद हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. राणीचा बाग, सश्याचे कान आणि परी गं परी अशी त्यांनी लहान मुलांसाठीही पुस्तकं लिहिली. स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.आज जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अनेक गाजलेल्या कवितांचे स्मरण करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.विंदांची देणाऱ्याने देत जावे ही एक सर्वमान्यता लाभलेली सुप्रसिद्ध कविता आहे.

देणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावेहिरव्यापिवळ्या माळावरूनहिरवीपिवळी शाल घ्यावी,सह्याद्रीच्या कड्याकडूनछातीसाठी ढाल घ्यावीवेड्यापिशा ढगाकडूनवेडेपिसे आकार घ्यावेरक्तामधल्या प्रश्नांसाठीपृथ्वीकडून होकार घ्यावेउसळलेल्या दर्याकडूनपिसाळलेली आयाळ घ्यावीभरलेल्याश्या भीमेकडूनतुकोबाची माळ घ्यावीदेणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावेघेता घेता एक दिवसदेणाऱ्याचे हात घ्यावेत

याबरोबरच समाजाच्या एकूण स्थितीवर भाष्य करणारी त्यांची सब घोडे बारा टक्के ही कविता आजही तितकीच विचार करायला लावणारी आहे..जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठकोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्केसब घोडे बारा टक्के!गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग;तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के!जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी;(जिकडे टक्के तिकडे टोळी) ज्याचा पैसा त्याची सत्तापुन्हा पुन्हा हाच कित्ता; पुन्हा पुन्हा जुनाच वारमंद घोडा जुना स्वार; याच्या लत्ता त्याचे बुक्केसब घोडे बारा टक्के!सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्यांची हमी?डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?कोणी तरी देईन म्हणा मीच फसविन माझ्या मना!भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?कोणी तिऱ्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!

समाजातील संवेदनहीन परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी माझ्या मना बन दगड  या कवितेतून भावना व्यक्त केल्या होत्या...

हा रस्ता अटळ आहे !अन्नाशिवाय, कपड्याशिवायज्ञानाशिवाय, मानाशिवायकुडकुडणारे हे जीव पाहू नको, डोळे शिव!नको पाहू जिणे भकास, ऐन रात्री होतील भासछातीमधे अडेल श्वास,विसर यांना दाब कढमाझ्या मना बन दगड!हा रस्ता अटळ आहे !ऐकू नको हा आक्रोशतुझ्या गळ्याला पडेल शोषकानांवरती हात धरत्यांतूनही येतील स्वरम्हणून म्हणतो ओत शिसेसंभाळ, संभाळ, लागेल पिसे!रडणाऱ्या रडशील किती?झुरणाऱ्या झुरशील किती?पिचणाऱ्या पिचशील किती?ऐकू नको असला टाहोमाझ्या मना दगड हो!हा रस्ता अटळ आहे !येथेच असतात निशाचरजागोजाग रस्त्यावरअसतात नाचत काळोखात;हसतात विचकून काळे दातआणि म्हणतात, कर हिंमतआत्मा विक उचल किंमत!माणूस मिथ्या, सोने सत्यस्मरा त्याला स्मरा नित्य! भिशील ऐकून असले वेदबन दगड नको खेद!बन दगड आजपासूनकाय अडेल तुझ्यावाचूनगालावरचे खारे पाणीपिऊन काय जगेल कोणी?काय तुझे हे निःश्वासमरणाऱ्याला देतील श्वास?आणिक दुःख छातीफोडेदेईल त्यांना सुख थोडे?आहे तेवढे दुःखच फारमाझ्या मना कर विचारकर विचार हास रगडमाझ्या मना बन दगडहा रस्ता अटळ आहे !अटळ आहे घाण सारीअटळ आहे ही शिसारीएक वेळ अशी येईलघाणीचेच खत होईलअन्यायाची सारी शितेउठतील पुन्हा, होतील भुतेया सोन्याचे बनतील सूळसुळी जाईल सारे कूळऐका टापा! ऐका आवाज!लाल धूळ उडते आजत्याच्यामागून येईल स्वारया दगडावर लावील धार!इतके यश तुला रगडमाझ्या मना बन दगड

एटू लोकांचा देशमध्ये ते लहान मुलांच्या अद्भूत विश्वात घेऊन जातात. आज या कवितांना पाच ते सहा दशके झाली असली तरी आजही या कविता सर्वांच्या स्मरणात आहेतच त्याहून त्या पुन्हापुन्हा वाचाव्याश्या वाटतात.

‘तिबेटाच्याजरा खालीहिमालयाच्याजरा वरएटू लोकांचाअद्भुत देशप्रत्येकाजवळउडते घर,टिंग म्हणतायेते खाली,टुंग म्हणताजाते वर..’हे एटू लोक कसे असतात? तर,

‘एटू असतातगोरे, गोरे,एटू असतातछोटे, छोटे.पण पुरुषाच्यापाठीमागेशेपूट असतेफार मोठे.तेच फिरवूनडोक्यावरतीएटू बांधतातछान फेटे..’

 

 

 

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठी