शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

Vinayak Mete Death: विनायक मेटेंचे अपघाती निधन; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 08:09 IST

Vinayak Mete Passed Away: एका अज्ञात वाहनावर मागून मेटेंची गाडी धडकल्याचे चालकाने सांगितले. अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला हलविण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना निधन झाल्याची कल्पना दिली. डॉ. धर्मांग यांनी मेटे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एमजीएमला पोहोचणार आहेत. विनायक मेटेंच्या पत्नीलाही याबाबत कळविण्यात आले आहे. एका अज्ञात वाहनावर मागून मेटेंची गाडी धडकल्याचे चालकाने सांगितले. अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अपघाताचे वृत्त समजताच भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पोहोचले आहेत. मेटे यांची कार बीडकडून मुंबईकडे येत होते. या दरम्यान, मेटेंच्या कार चालकाने गंभीर आरोप केले आहेत. राम ढोबळे पोलीस बॉडीगार्ड गंभीर जखमी आहेत.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला. त्यांनी मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत. मला मुका मार लागला आहे. गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय, असे कदम म्हणाले. 

छोटा टेम्पो चालकाने मदत केली. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, असे कदम यांनी सांगितले. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेAccidentअपघात