मुलीला पळविणाऱ्या आरोपींसह पोलिसांना ग्रामस्थांनी डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 19:16 IST2016-07-29T19:16:24+5:302016-07-29T19:16:24+5:30
कोपर्डीची घटना ताजी असतानाच कर्जत तालुक्यातील भांबोरा गावाजवळ एका शालेय मुलीला वाटेत अडवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न आज दुपारी झाला

मुलीला पळविणाऱ्या आरोपींसह पोलिसांना ग्रामस्थांनी डांबले
ऑनलाइन लोकमत
अ.नगर, दि. २९ : कोपर्डीची घटना ताजी असतानाच कर्जत तालुक्यातील भांबोरा गावाजवळ एका शालेय मुलीला वाटेत अडवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न आज दुपारी झाला. यातील तीन आरोपींना ग्रामस्थांनी पकडले आहे. या आरोपींना नेण्यासाठी आलेले पोलीस दारू पिऊन तर्रर्र असल्याने त्यांच्यासह आरोपींना ग्रामस्थांनी डांबून ठेवले आहे.
भांबोरा ते दुधवडी रस्त्यावर एक शाळकरी मुलगी घरी जात असताना पाच तरुणांनी तिला अडविले. या मुलीला उसाच्या शेतात नेले जात असताना तिने आरडाओरडा केला. मुलीच्या चुलतभावाला तिचा आवाज ऐकू आल्यानंतर त्यानेही आरडाओरडा केला. वस्ती जवळच असल्याने लगेच ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी पाच तरुणांपैकी तिघांना पकडले आहे.
या आरोपींना भांबोरा गावात ग्रामपंचायतीत ठेवण्यात आले. पोलिसांना ही माहिती कळविल्यानंतर दोन पोलीस व एक होमगार्ड आला. मात्र, पोलीसच दारु पिलेले असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने या सर्वांना गावाने डांबून ठेवले आहे.